ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय चिकाडी ता सुरगाणा जि नाशिक
गावात जिल्हा परिषद शाळा इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत आहे थविलपाडा हा चिकाडी महसूल गावांतर्गत पाडा आहे थविलपाडा येथे जिल्हा परिषद शाळा इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत आहे
चिकाडी गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणने नुसार ११८५ इतकी आहे चिकाडी आणि थविलपाडा येथे अंगणवाडी केंद्र आहेत व त्या दोन्ही गावामध्ये मुख्यत भात,नागली,वरई,सोयाबीन
उडीद हि पिके शेतामध्ये घेतली जातात चिकाडी गावामध्ये मोतोबा मंदिर आहे व जानेवारी महिन्यात पुश पौर्णिमेला यात्रा सुधा भरते यात्रेला आजूबाजूच्या गावातील लोक यात्रेचा आनंद घेतात.
मौजे उंबरदे (मा)
उंबरदे (मा) हे गाव चिकाडी ग्रामपंचायत पासून १५ km अंतरावर असून देवमाळ हा पण आहे
येथील २०११ च्या जनगणने नुसार लोकसंख्या ९६२ इतकी आहे गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती शेतमजुरी
हा आहे पावसाळ्यात मुख्यत भात,नागली,वरई,उडीद, हि पिके घेतली जातात देवमाळ येथे जिल्हा परिषद शाळा १ ते ४ थी
पर्यंत असून उंबरदे (मा) येथे १ ते ८ पर्यंत शाळा आहे तसेच उंबरदे येथे आणि देवमाळ येथे अंगणवाडी केंद्र आहेत असे
हे दोन्ही महसुली गावे ग्रामपंचायत चिकाडी गावामध्ये वसलेले आहेत.












